ॲप मध्ये समाविष्ट बाबी
१ . ई लर्निंग व्हिडीओ - सेमी सह सर्व विषयांचे ई-लर्निंग व्हिडिओ उपलब्ध आहेत.
२. ऑनलाइन टेस्ट - इ.१ ली ते इ. १० वी मधील विद्यार्थ्यांना विषयांचा अभ्यास तपासण्यासाठी विषय निहाय ऑनलाईन टेस्ट उपलब्ध
३. आजचा घरचा अभ्यास - ऑनलाईन शिक्षणासाठी उपयुक्त इयत्ता इ.१ ली ते इ. ८ वी मधील विद्यार्थ्यांना Online Guru या ॲप मधील आजचा घरचा अभ्यास टॅब मध्ये घटक समजावून देणारा ई लर्निंग व्हिडीओ व त्यावर आधारित लेखी प्रश्न असणारा घरचा अभ्यास दररोज सकाळी ७.०० वाजता उपलब्ध होतो. आजच्या अभ्यासाबरोबरच विद्यार्थी मागील तारखांचा देखील अभ्यास एका क्लिकवर सहज मिळवू शकतात .
ॲपची वैशिष्ट्ये
एका ऍपवरून इ.१ ली ते इ. १० वी इयत्तांचे एकाच घरातील विद्यार्थी अभ्यास करू शकतात.
ॲप मध्ये सुरुवातीला एकदा इयत्ता सीलेक्ट केल्यानंतर पुन्हा ऍप सुरू केल्यानंतर त्याची इयत्तेचा अभ्यास , ई लर्निंग व्हिडीओ ,ऑनलाइन टेस्ट विद्यार्थ्यांना दिसतो.
दरवेळी लॉग इन करण्याची, पासवर्ड लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही.
एका क्लिकवर विद्यार्थी इयत्ता बदलू शकतात .
आकर्षक व विद्यार्थी वयोगट लक्षात घेऊनकरून डिझाईन केलेली रंगसंगती
विद्यार्थी त्यांच्या वेळेनुसार व मोबाईलच्या उपलब्धतेनुसार आपल्या इयत्तेचे ई लर्निंग व्हिडिओ ऑनलाईन टेस्ट व आजचा घरचा अभ्यास तसेच मागील घरचा अभ्यास देखील सहज करू शकतात .
ऑडिओ,इमेजेस, व्हिडीओ, गुगल फॉर्म अशा विविध माध्यमांचा वापर
ॲप मध्ये ऑनलाइन टेस्ट दिल्यानंतर विद्यार्थ्यांना बरोबर उत्तरे चुकलेली उत्तरे यांसहित मिळालेले गुण लगेच कळणार .